Tech-News 5 : Android 15 सुपर डार्क-मोड सोबत, Aadhaar Card : नवीन SCAM?

By PST

Updated on:

Tech-News 5 Android 15 सुपर डार्क-मोड सोबत, Aadhaar Card नवीन SCAM

नमस्कार वाचकांनो Gadget-Gappa च्या TECH News 5 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या टेक-न्यूज मध्ये  AI Technology मध्ये भारताचे स्थान,  Android 15 ला येणाया नवीन सुपर डार्क-मोड फिचर, Aadhaar card मध्ये सापडला नवीन घोटाळा, X चा ठप्प झालेला कारभार आणी Meta Thread ला  मिळाली प्रेक्षकांची पसंती याबाबत माहिती घेणार आहोत.

AI Technology मध्ये भारताचे नाव अव्वल

भारत, अमेरिका, युनायटेड किंग्डम, सिंगापूर आणी संयुक्त राष्ट्रामध्ये AI Technology आणी त्यातील नविन शोध यात हि राष्ट्रे अग्रेसर आहे. या विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणी स्पेन असे काही देश जास्त प्रगत श्रेणीत येत नाहीत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजी वर संपूर्ण जगात रोज नवनवीन शोधकार्य सुरू आहे. यामध्ये भारतातील शास्त्रज्ञ सुध्दा गांभीर्याने काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वे मध्ये भारतामधील AI Technology हि उच्च दर्जाची असुन सर्वात जास्त प्रगतीशील आहे. या अहवालामध्ये दहा देशामधील 1300 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ याचा समावेश आहे.

तसेच भारतामध्ये कार्यरत असलेल्या कंपनीमध्ये 60% पेक्षा जास्त कंपनी या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून आपल्या कंपनी चा नफा वाढवत आहेत. तर ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणी स्पेन असे काही देश यातील कंपनी केवळ 36% इतकेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्राचा वापर करीत आहेत. भारतामध्ये 70% कंपनीमध्ये हायब्रीड IT वातावरण यशस्वीरीत्या प्रस्थापित झाले आहे. AI Technology च्या वापरामुळे भारतातील उत्पादक क्षमतेत 50% नी वाढ झाली आहे. तर ऑटोमेशनचा वापर 46% नी वाढलाय. त्यामुळे भारताने आता जगाच्या शर्यतीमध्ये AI Technology बाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे.


Android 15 : अँड्रॉइड 15 मध्ये मिळणार काही खास फीचर

Android 15 आता गुगलकडून पुढील महिन्यात लॉन्च होणार आहे. रोज काहीतरी अपडेट Android 15 बाबत बाहेर येत आहे. त्यात आता Android 15 मध्ये सुपर डार्क मोड हे फीचर येणार आहे असे समजले आहे. त्यामुळे वापरकर्त्याच्या बऱ्याच समस्या सुधारू शकतात. याआधी येणार डार्क मोड ग्राहकांना आवडतो कारण त्यामुळे स्मार्टफोनचा सर्व इंटरफेस काळ्या छटेत होऊन बॅटरी लाईफ वाढण्यास मदत होते. परंतु Android 15 मध्ये येणारा सुपर डार्क मोड आता सुधारित करण्यात आला आहे.

तसेच प्लेस्टोअर मधले काही ॲप हे पूर्वीच्या डार्क मोडला सपोर्ट करत नव्हते ते सुद्धा आता या नव्या सुपर डार्क मोडला सपोर्ट करणार आहे.  यामुळे वापरकर्त्यांना डार्क मोड वापरताना होणाऱ्या समस्याचे निराकरण होणार आहे. तसे या नवीन डार्क मोड मध्ये येणाऱ्या काळा छटा सर्व ॲप मध्ये समान असणार आहे. त्यामुळे वारंवार ॲप बदलताना युसरला चांगला अनुभव येणार आहे. Android 15 च्या बीटा कोड मधून असे समजले कि थर्ड पार्टी ॲपला सपोर्ट करण्यासाठी नवीन अल्गोरिथम वापरण्यात आला आहे. डार्क मोड फीचर सगळ्यात पहिले 2019 वर्षी Android 10 मध्ये आले होते.

गुगलचे म्हणणे आहे की ॲपचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी नवीनतम Android मध्ये नवीन पर्याय केले गेले आहेत. याच्या मदतीने डेव्हलपर कोणत्याही ॲपची कार्यक्षमता सुधारू शकतात. हे एप्लिकेशनसाठी API देखील तयार करते. नवीन Android मध्ये स्प्लिट-स्क्रीन ॲप्स कसे सेव्ह करायचे, ब्रेल डिस्प्लेसाठी टॉकबॅक समर्थन इत्यादी गोष्टी वापरकर्त्यांना मिळतील. नवीन अँड्रॉइडच्या मदतीने, वापरकर्ते त्यांच्या डिव्हाइसमधील ऑडिओचा आवाज समायोजित करण्यास सक्षम असतील. HDR हेडरूम नियंत्रित करण्यास सक्षम असतील. टायपिंगमध्येही नवीन फॉन्ट दिसतील.

Google ने स्मार्टफोनसाठी आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम Android 15 ची चाचणी सुरु केली आहे. ती अनेक महिने बीटा चाचणीत होती. एका ब्लॉग पोस्टमध्ये, Android ने घोषणा केली की त्याचा सौर्स कोड Android ओपन सोर्स प्रोजेक्ट (AOSP) वर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा अर्थ स्मार्टफोन निर्माते त्यांच्या उपकरणांसाठी या ऑपरेटिंग सिस्टमचे (OS) कस्टम प्रकार तयार करू शकतात आणि ते पोर्ट करू शकतात. Google ने देखील याबाबत खात्री केली आहे की Android 15 चे रोलआउट येत्या आठवड्यात सुरू होईल. सर्व प्रथम ते Google च्या इन-हाउस Google Pixel स्मार्टफोनमध्ये येईल.


Aadhaar Card : नविन फसवणूक आली समोर

Aadhaar Card – आधारकार्ड असणाऱ्या नागरिकांनी आता सावध होण्याची गरज आहे. आधारकार्ड वापरून सिमकार्ड घेतले जाते. त्यांनतर त्या सिमचा वापर धमकी देण्यासाठी केला जातो. आणी त्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीची कामे केली जातात. त्यामुळे आधारकार्ड सुरक्षित ठेवणे फार गरजेचे आहे. Aadhaar card हे एक असे डॉक्युमेंट आहे, ज्याचा वापर शाळा-कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापासून सिमकार्ड, रेशन घेणे अशा विविध कामांसाठी होतो. तसेच बँकमधील खात्याला सुद्धा आधार लिंक केले जाते. त्यामुळे आधारकार्डचे महत्व जास्त वाढते.

जर तुम्हाला तुमचे आधारकार्ड सुरक्षित ठेवायचे असेल तर खालील गोष्टीमध्ये नीट लक्ष द्या. अन्यथा तुम्ही सुद्धा या फ्रौडचे शिकार होऊ शकता.

  • तुमच्या डिजिटल आधारकार्डचा डेटा हा तुमच्या व्यतिरिक्त इतर अन्य कुठल्याही व्यक्तीच्या स्मार्टफोन मध्ये असल्यास तो त्वरित डिलीट करा.
  • तुम्ही लेटेस्ट वापरत असलेल्या मोबाईल क्रमांक तुमच्या आधारकार्डला संलग्न करा. लेटेस्ट मोबाईल क्रमांक नेहमी अपडेट ठेवा.
  • आधारकार्डची बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन आधारकार्डच्या वेबसाइटला भेट देऊन नेहमी लॉक करून ठेवा.
  • काही ठराविक कालावधीत आधारकार्ड वापराची हिस्टरी चेक करत जा.
  • त्याचप्रमाणे कुठल्याही शासकीय किंवा खाजगी ठिकाणी कामासाठी आधार नंबर देयाचा असल्यास मास्क आधार नंबरचा पर्याय स्वीकारा.
  • तसेच कुठल्याही अनोळखी व्यक्तीस आपले आधारकार्ड देऊ नका.
  • आधार सबंधित येणारे OTP याची माहिती कोणीही ‘मी सरकारी अधिकारी आहे’ असे सांगून मागणी करत असेल तर त्याला ते OTP देऊ नये. आपल्या आयश्यक्तेनुसर आधार OTP चा वापर करावा.
  • सोशल मिडियाच्या माध्यमातून आधारकार्डची कुठलीही गोपनीय माहिती शेअर करू नये.
  • UIDAI हीच आधारकार्डची अधिकृत वेबसाईट आहे. इतर अन्य कुठल्याही वेबसाईट वर आधार कार्डच्या लॉगीन डिटेलची माहिती शेअर करू नये.

या सर्व गोष्टी नियमितपणे फॉलो केल्यास तुमचे आधारकार्ड सुरक्षित राहील.


X Down :- एलोन मस्क चे X झाले आज पुन्हा ठप्प

X Down झाले आज पुन्हा एकदा, त्यामुळे X वापरकर्त्यांनी त्यांची नाराजी इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. Downdetector यांनी सुद्धा याची दखल घेत X ठप्प झाले आहे याची पुष्टी केली. आज 29 एप्रिल 2024 रोजी सुमारे दुपारी 12.47 पासून X हे ठप्प झाले होते. X कडून या आठवड्याभरात दोनदा कामकाज ठप्प झाले आहे. 26 एप्रिलला असाचा प्रकार X वापरकर्त्यांनी नोंदवला होता.  आज 51% लोकांनी X च्या ॲपची तक्रार नोंद केली. तर 47% लोकांनी X च्या वेबसाईट मध्ये तक्रार दाखल केली. काही वेळेस ठप्प झालेल्या या कारभारनंतर पुन्हा X आता सुरळीत काम करू लागले आहे.


Instagram Thread :- सुरवातीला अपयश आता मात्र पॉप्युलर

Instagram thread हे मेटाचे प्रॉडक्ट मागील वर्षी लॉन्च झाले होते. याला मुख्यतः एलोन मस्क च्या X या ॲप्लिकेशन ला टक्कर देण्यासाठी विकसित केले होते. सुरवातीला थ्रेड या ॲपला लोकांनी मेटाला अपेक्षित असेल असा प्रतिसाद दिला नाही. परंतु आता मात्र एका नवीन रिपोर्टच्या अनुषंगाने ही माहिती समोर आली आहे, कि मेटा थ्रेडने ॲक्टिव मंथली युजरच्या संख्येत प्रचंड वाढ केली आहे. ॲक्टिव मंथली युजरच्या संख्येने 15 करोडचा टप्पा पार केला आहे. यावर्षी फेब्रुवारी मध्ये हीच संख्या 130 मिलियन म्हणजे 13 करोड इतकी होती. त्यामुळे सुरवातीला अपयश आलेल्या मेटाच्या थ्रेडला आता लोकांनी पसंती दर्शवली आहे. थ्रेडवर असणाऱ्या युजरची आकडेवारी याची माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.

कुठल्याही नविन टेक्नॉलॉजी विषया-संदर्भातील माहिती हवी असल्यास तो विषय कॉमेंट्सच्या माध्यमातून किंवा आमच्या इतर सोशल-मिडियाच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद..

Leave a Comment

Test
Test