Tech-News 1 : Samsung Green line issue? Apple Vision Pro ला ग्राहकांची नापसंती..

By PST

Updated on:

Tech-News 2 Samsung Green line issue Apple Vision Pro ला ग्राहकांची नापसंती..

नमस्कार वाचकांनो Gadget-Gappa च्या TECH News 1 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या टेकन्यूज मध्ये Samsung Green line issue, Apple चा Vision Pro, Realme Narzo 70x, Apple’s चा ‘Let Loose’ हा खास event आणी Xiaomi चे Smarter Living 2024 याबाबत माहिती घेणार आहोत.

Samsung Green line issue

डिस्प्लेला ग्रीन लाईन इश्यू येणे हि समस्या सॅमसंग च्या स्मार्टफोन मध्ये जुनी आहे. तसेच हि समस्या दूर करण्यासाठी बऱ्याचदा स्मार्टफोन चा डिस्प्ले हा नवीन बसवावा लागतो. हे काम खूपच खर्चिक असते. परंतु आता जर तुमच्या स्मार्टफोन मध्ये हा ग्रीन लाईन इश्यू आला असेल तर तुम्ही खुश होणार आहात. याचे कारण नुकतीच सॅमसंग ने “टाईम बॉण्ड” योजना लॉन्च केली आहे. या टाईम बॉण्ड योजने अंतर्गत तुमची ग्रीन लाईन इश्यू असणारी डिस्प्ले मोफत सॅमसंग कडून रिप्लेस करून भेटणार आहे.

Samsung Green line issue 2024

एवढेच नाही तर त्यासोबत सॅमसंग कडून मोफत तुमची बॅटरी सुद्धा बदलून मिळणार आहे. ही ऑफर सॅमसंग च्या S20, S21, S22 सिरीज आणी Note 20 सिरीज या सर्व स्मार्टफोन मध्ये मिळणार आहे. तसेच या स्मार्टफोन ची जरी वॉरेंटी संपली असेल तरीही तुम्हाला मोफत डिस्प्ले आणी बॅटरी बदलून मिळणार आहे. हि बातमी ग्रीन लाईन इश्यू असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची आहे परंतु हि ऑफर फक्त 30 एप्रिल पर्यंत मर्यादित असल्याने तुम्हाला या तारखेच्या आत सॅमसंग स्टोअर ला भेट देऊन तुमची समस्या सोडवायची आहे.

Apple Vision Pro

Apple Vision Pro 2024

श्री. मीन चिको हे ॲपल कंपनीचे सिनियर ॲनालिस्ट आहेत. यांनी अशी शंका उपस्थित केली आहे की ॲपलचा व्हिजन-प्रोला लोकांचा प्रतिसाद हा कंपनीने जशी अपेक्षा केली होती त्याप्रमाणे नाही आहे. ॲपलचा व्हिजन-प्रो खरेदी केल्यानंतर सुद्धा लोक नाखूष आहेत. काही लोक ॲपलला हे डिव्हाईस पुन्हा परत करत आहेत. त्याचे प्रमुख कारण त्याची किंमत असू शकते. कारण 3500 USD असलेली किंमत हि ग्राहकांना जास्त वाटते. जवळजवळ भारतीय मुल्याप्रमाणे 2,90,000/- किंमत असलेली हि गोष्ट तितकीशी लोकांच्या उपयुक्त नाहीये. त्यामुळे याची किंमत जर 1000-1500 USD असती तर लोकांनी याला खरेदी करण्यात रस दाखवला असता. Apple Vision Pro बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Apple इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेटा.
अधिकृत वेबसाईट – Apple 

Realme Narzo 70 आणी 70x

आज भारतीय मार्केट मध्ये रिअलमी इंडियाकडून Realme Narzo 70 आणी Realme Narzo 70x असे दोन स्मार्टफोन लॉन्च केलेत. फोनचे डिझाईन वेगळे करण्यासाठी कंपनीने बॅक पॅनलवर ड्युअल टोन पॅटर्न वापरला आहे. यात गोलाकार कॅमेरा मॉड्यूल आहे. Realme Narzo 70x हा एक 5G स्मार्टफोन असून 11,999/- किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहे. तर Realme Narzo 70 हा 15,999/ मध्ये मिळणार आहे. Realme Narzo 70 हा 6 नॅनोमीटर Dimensity 7050 या प्रोसेसर सहित येतो. यात 120hz अमोलेड डिस्प्ले, 8 gb डायनॅमिक रॅम आणी 5000mah ची बॅटरी 45 वॉट फास्ट सुपरवूक चार्जर सहित येणार आहे.

Realme Narzo 70 आणी 70x 2024

हँडसेट सिंगल बॉटम फायरिंग स्पीकरसह येतो. एकूणच स्मार्टफोन प्रीमियम दिसत आहे. तथापि, मागील पॅनेल चकचकीत आहे, ज्यामुळे घाण सहज दिसून येते. आपण ते फक्त कव्हरसह वापरावे. एकूणच हा फोन डिझाईनच्या बाबतीत थोडा नवीन दिसतो. Realme Narzo 70x हा सुद्धा Dimensity 6100 या प्रोसेसर सहित येतो. कंपनीने या फोनमध्ये रेनवॉटर टच-डिस्प्ले आणि एअर जेश्चर सारखे फीचर्स देखील दिले आहेत. स्मार्टफोन 50MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात आपल्याला 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा मिळतो. यात 120hz अमोलेड डिस्प्ले, 8gb डायनॅमिक रॅम आणी 5000mah ची बॅटरी 45 वॉट फास्ट सुपरवूक चार्जर सोबत येणार आहे. Realme Narzo 70 आणी Realme Narzo 70x बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रिअलमी इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अधिकृत वेबसाईट – Realme

Apple Let Loose Event

Apple Let Loose Event 2024

बऱ्याच वेळेपासून प्रतिक्षित असलेला ॲपलचा Let Loose इव्हेंट हा 7 मे ला पार पडणार आहे. या इव्हेंट मध्ये त्यांचा फ्लगशिप आयपॅड M3 प्रोसेसर सहित लॉन्च होईल ही अपेक्षा आहे. तसेच तिसऱ्या जनरेशन ची ॲपल पेन्सिल सुद्धा येणार आहे. 11″ आणी 12.9″ LTPO ओलेड डिस्प्लेची टेक्नॉलॉजी या लेटेस्ट आयपॅड मध्ये वापरण्यात येईल. या आयपॅड ची मजबूत बिल्ड क्वालिटी आणी जास्तीत जास्त स्लिम करण्यावर ॲपलच्या इंजिनिअर कडून प्रयत्न करण्यात आला आहे. गीकबेंच च्या CPU स्कोअर अहवालामध्ये मागील वर्षीचा M2 चीपसेट हा 2538 पॉइंट सिंगल स्कोअर आणी 9624 पॉइंट मल्टी स्कोअर असा आहे. परंतु या वर्षीच्या M3 चीपसेट वापरून हे स्कोअर वाढवण्याचा प्रयत्नात ॲपलची टीम आहे. तसेच प्रोसेसरचा GPU स्कोअर आणी हिट मॅनेजमेंट यात सुद्धा सुधारणा करण्यात येणार आहे.

Smarter living 2024

Smarter living 2024 Mi india

मित्रानो Xiaomi ने स्मार्टर लिव्हिंग या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी दैंनदिन वापरत येणाऱ्या काही गोष्टी स्मार्ट स्वरूपात कशा करता येतील यासाठी काही स्मार्ट प्रॉडक्ट बाजारात आणले आहेत. यात प्रथम Xiaomi ने Robot Vacuum cleaner S10 लॉन्च केला आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात LDS लेझर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कचरा खेचून घेताना अचूकता आणी वेग यात सुधारणा झाली आहे. 4000pa चा टर्बो सक्शन वापरण्यात आला आहे. तसेच यात Zig-Zag आणी Y-Shape चे कलीनिंग पॅटर्न दिले आहेत. हा Vacuum cleaner Mi / Xiaomi Home app द्वारे सुद्धा कंट्रोल करता येतो.

त्याचबरोबर Redmi Pad SE 11″ फुल HD स्मूथ 90Hz डिस्प्ले सहीत लॉन्च करण्यात आला. यात वापरण्यात आलेला Snapdragon 680 प्रोसेसर जो 6 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी वर कार्यरत आहे. पुढील प्रमाणे 4GB+128GB / 6GB+128GB / 8GB+128GB चे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच 8000mah ची बॅटरी असून 10 वॉट सपोर्ट करणारी चार्जिंग प्रणाली देण्यात आली आहे. हा टॅबलेट बजेट श्रेणीतील ग्राहकांसाठी उत्कृष्ट पर्याय आहे.

Xiaomi ने Redmi Bud 5A हा स्मार्ट ब्लूटूथ इयरफोन सुद्धा प्रदर्शित केला. यामध्ये 25db ॲक्टिव नोईस कॅन्सलेशन चा वापर करण्यात आला आहे. तसेच गूगलच्या फास्ट पैरींग मोडला हा स्मार्ट ब्लूटूथ इयरफोन सपोर्ट करतो. याच्या स्पीकर मध्ये खास 12mm चे स्मार्ट ड्रायव्हर वापरले गेले आहेत. यात मार्केट मध्ये नवीन असलेले ENC (एनवायरमेंटल नोईस कॅन्सलेशन) हे फीचर AI च्या टेक्नोलॉजी वर आधारित आहे ते दिले गेले आहे. तसेच हा इयरफोन स्मार्ट ब्लूटूथ 5.4 च्या आवूर्ती मध्ये येतो.

Xiaomi ने Handheld Garment Steamer सुध्दा लॉन्च केला आहे. हा कॉम्पॅक्ट स्वरूपाचं असून सर्व प्रकारच्या कपड्यांसाठी सुरक्षित आहे. यात 1300 वॉटची अल्ट्रा पॉवर मोटर वापरण्यात आली आहे. जवळजवळ 26 सेकंदापेक्षा पण कमी वेळेत हा गरम वाफ तयार करतो. यात सिरॅमिक सोलेप्लेट चा वापर केल्यामुळे समान गरम वाफेची विभागणी तसेच एकसारखीच कपड्यांना वाफ देण्यात येते त्यामुळे चुरघळलेले कपडे व्यवस्थित कडक होतात.

हे सर्व Xiaomi Smarter Living चे प्रॉडक्ट्स धमाकेदार किंमतीमध्ये लॉन्च होतात. यात Redmi Pad SE 12,999/- पासून मिळतो. तर Redmi Bud 5A हे सुध्दा 1,499/- ला मिळतात. आणी तुम्हाला जर रोबोट आणी Ai च्या माध्यमातून आपले घर स्वच्छ करायचे असेल तर तुम्हाला Robot Vacuum cleaner S10 हा 19,999/- ला मिळेल. आणी जो Handheld Garment Steamer आहे तो 2,399/- भेटेल.

कुठल्याही नविन टेक्नॉलॉजी विषया-संदर्भातील माहिती हवी असल्यास तो विषय कॉमेंट्सच्या माध्यमातून किंवा आमच्या इतर सोशल-मिडियाच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद..

Leave a Comment

Test
Test