Galaxy S24 Ultra भारतीय मार्केट मध्ये जानेवारी महिन्यात लाँन्च झाला होता. सॅमसंग हि कोरियन कंपनी नेहमीच उत्कृष्ट स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये लाँन्च करण्यात अग्रेसर असते. मागच्या वर्षी सॅमसंगने Galaxy S23 Ultra, S23 Plus आणी S23 असे फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँन्च केले होते. यंदाही त्यांनी धमाकेदार AI फिचर्स सहित S24 Ultra, S24 Plus आणी S24 असे स्मार्टफोन लाँन्च केले आहेत. मुख्यतः सॅमसंगची स्पर्धा हि तिच्या प्रतिस्पर्धी कंपनी अँपल सोबत असते. गेल्या वर्षी अँपल ने Iphone 15 हा खास AI फिचर्स सहित लाँन्च केल्यामुळे त्याला टक्कर देण्यासाठी सॅमसंग सुद्धा AI फिचर्स घेऊन मार्केट मध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी सॅमसंगचे फॅन या S-सिरीजची आतुरतेने वाट पाहत असतात.
Galaxy S24 Ultra या वर्षी सॅमसंगचे प्रिमियम स्मार्टफोन प्रोडक्ट आहे. आपल्याला बॉक्स मध्ये स्मार्टफोन, यूएसबी टाईप सी केबल, सिमकार्ड इजेक्टर टूल आणी डॉक्युमेंट गाईड या गोष्टी पाहायला मिळतात. या स्मार्टफोन सोबत चार्जर बॉक्स मध्ये येत नाही. हा स्मार्टफोन आपल्याला Titanium Black, Titanium Gray, Titanium Violet ह्या तीन कलर ऑप्शन मध्ये मिळतो. तसेच मेमरी साइज 256 GB, 512 GB, आणी 1 TB ती पण 12 GB रॅम सोबत उपलब्ध आहे. S24 Ultra ची डिझाईन, डिस्प्ले, प्रोसेसर, सॉफ्टवेअर, कॅमेरा, बॅटरी, कनेक्टिव्हिटी, अशी काही खास वैशिष्ट्ये त्याचप्रमाणे समाधानकारक व काही असमाधानकारक गोष्टी या सगळ्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
डिझाईन
Galaxy S24 Ultra च्या डिझाईन बाबत आपण जाणून घेऊया. हा स्मार्टफोन 232 ग्रॅम हलक्या वजनाचा आहे कारण यात टायटॅनियम फ्रेम चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या स्मार्टफोनची बनावट मजबूत स्वरूपाची आहे. यामध्ये असणाऱ्या पोर्ट्स आणी बटन्स ची माहिती आपण घेऊयात याच्या खालील बाजूस सिमकार्ड, माईक, यूएसबी टाइप सी 3.2 Gen-1, स्पीकर, S पेनसाठी जागा आहे. तर वरील बाजूस दोन नॉईज कॅन्सलेशन माईक आहेत. तर उजव्या बाजुला आवाज कमी-जास्त करणारे बटन तर त्याखाली ऑन-ऑफ साठी पॉवर बटन उपलब्ध आहे. तसेच पुढील आणी मागील बाजूस लेटेस्ट गोरिला ग्लास आर्मर प्रोटेक्शनची सुरक्षितता आहे. तसेच पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी आयपी 68 चे प्रोटेक्शन दिलेलेच आहे.
डिस्प्ले
S24 Ultra या मध्ये 6.8″ QHD+ (1440 x 3120 px) डायनॅमिक LTPO अँमोलेड 2X डिस्प्ले सोबत 120Hz रिफ्रेश रेट आहे. त्यासोबत 2600 नीटस ची पिक ब्राईटनेस आहे. आणी डिस्प्ले संपूर्ण फ्लॅट स्वरूपाचा आहे. तसेच या मध्ये लो रिफ्लेक्शन डिस्प्ले वापरण्यात आला आहे. त्यामुळे दैनंदिन बाहेरील वापरासाठी डिस्प्लेची स्पष्टता ठळक आहे. तसेच डिस्प्ले HDR ला सपोर्ट करते. त्यामुळे व्हिडिओ पाहताना मनोरंजनाची अनुभुती द्विगुणित होणार आहे. तसेच हा डिस्प्ले AOD (Always on Display) मध्ये AI चे नवीन वैशिष्ट्ये घेऊन आला आहे. मनोरंजक मल्टिमीडिया पाहण्यासाठी ह्या स्मार्टफोन चा डिस्प्ले सुदंर आहे.
प्रोसेसर
Galaxy S24 Ultra यामध्ये वापरण्यात आलेला प्रोसेसर हा स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 (Qualcomm SM8650-AC) आहे. हा S24 Ultra साठी खास वैशिष्टय पूर्ण पद्धतीने बनवण्यात आला आहे. तसेच 12 GB वेगवान रॅम सोबत हा प्रोसेसर 4 नॅनोमीटर या टेक्नोलोजी वर आधारित आहे. यात Adreno 750 (1 GHz) ग्राफिक प्रोसेसर आहे. तसेच उत्कृष्ट हिट मॅनेजमेंटसाठी या प्रोसेसर च्या कोअर मध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. यात 1.9x चे वेपर कुलिंग चेंबर वापरण्यात आले आहे. त्यामुळे गेमर ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन उपयुक्त आहे.
सॉफ्टवेअर
S24 Ultra हा Android 14 सोबत येणारा स्मार्टफोन आपल्याला पुढील 7 वर्ष Android अपडेट सोबत येणार आहे. म्हणजे २०३० पर्यंत आपल्याला Android 20 चा सॅमसंग कडून सॉफ्टवेअर सपोर्ट मिळणार आहे. सॅमसंगचे लेटेस्ट One UI 6.1 हे सॉफ्टवेअर आपल्याला S24 Ultra मध्ये भेटत आहे. तसेच Android सुरक्षिततेच्या सिक्युरिटी अपडेट सुद्धा सोबत मिळणार आहेत. याच्या AI फिचर ची माहिती घेऊयात. यामध्ये आपल्याला इंटर-ॲक्टिव सर्च, AI लाइव्ह त्रांसलेट तेही 13 भाषेतून उपलब्ध आहे. तसेच मोठे पॅराग्राफ असणारी माहिती आपण एस पेनच्या माध्यमातून संक्षिप्त स्वरूपात काही सेकंदात मिळणार आहे. तसेच जनरेटीव फोटो, अंबिएनट वॉलपेपर आणी बरच काही AI च्या धमाकेदार फिचर्समध्ये मिळणार आहे.
कॅमेरा
S24 Ultra चे सगळ्यांत मोठे फिचर ज्यासाठी या स्मार्टफोनची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. ते म्हणजे या स्मार्टफोनचा कॅमेरा जो 200 मेगापिक्सल (ISOCELL HP 25x) F1.7 चा प्रायमरी सेन्सर असून सोबत 12 मेगापिक्सल अल्ट्रावाइड F2.2 आणी 50 मेगापिक्सल 5X परिस्कोप F3.4 आहे. त्या सोबत एक 10 मेगापिक्सल चा 3X F2.4 टेलिफोटो सेन्सर सुद्धा उपलब्ध आहे. या सर्व फिचर मुळे लो लाईट फोटोग्राफी मध्ये पहिल्यापेक्षा जास्त सुधारणा झाली आहे.
सॅमसंगने S24 Ultra प्रो-व्हिज्युअल इंजिन कॅमेरा टेक्नॉलॉजी इंटिग्रेट केलेली आहे. त्यामुळे तुम्ही फोटो घेतल्या नंतर सुद्धा त्या फोटो मध्ये आपल्या गरजेनुसार बदल करू शकता. व्हिडिओ मध्ये सुद्धा AI टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे सॅमसंगचे स्लो मोशन व्हिडिओजची गुणवत्ता फार सुधारीत केली आहे. 4K मध्ये तुम्ही 120Fps शूटिंग करू शकता. सॅमसंग ने सेल्फी कॅमेरा मध्ये 12 मेगापिक्सल चा सेन्सर दिला आहे. त्यात 4k मध्ये तुम्ही 60Fps शूटिंग करू शकता. हि Vlogging करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे.
बॅटरी
Galaxy S24 Ultra या स्मार्टफोन मध्ये 5000 mah ची बॅटरी असुन 45 वॉट वायर चार्जिंग व 15 वॉट ची वायरलेस चार्जिंग आणी 4.5 वॉट रिव्हर्स वायरलेस चार्जिंग उपलब्ध आहे. याची बॅटरी पॉवर डिलिव्हरी 3.0 या टेक्नोलोजीला सपोर्ट करते. त्यामुळे स्मार्टफोन ची बॅटरी केवळ 30 मिनिटामध्ये 65% चार्ज होते.
» हे सुध्दा वाचा :- Realme P1 5g स्मार्टफोन प्रिमिअम फिनिक्स रेड डिझाईन मध्ये झाला लॉन्च Budget ₹15,000?
कनेक्टिव्हिटी
S24 Ultra या स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मध्ये 5G, दूहेरी 4G Volte, WiFi 7, ब्लूटूथ 5.3, NFC हे पर्याय मिळतील. सिमकार्डच्या बाबतीत दुहेरी नॅनो सिमकार्ड आणी एक इ-सिमचा पर्याय देखील आहे. फिंगर प्रिंट सिक्युरिटीमध्ये सुद्धा अल्ट्रासोनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे.
खास वैशिष्ट्य
Galaxy S24 Ultra च्या खास वैशिष्ट्यामध्ये सॅमसंग डेक्सचा सपोर्ट मिळणार आहे. हा सपोर्ट वायर आणी वायरलेस या दोन्ही माध्यमातून भेटणार आहे. हे फिचर तुमचा PC किंवा Laptop यांना तात्काळ बदलण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यात S पेन आणी AI च्या जोडीने कमालीचे ऑफिस कामाच्या प्रोडक्टिव्हिटीसाठी फायदेशीर ठरणारे आहे. वरील सर्व फिचर्स 2024 मध्ये या स्मार्टफोनला फ्लॅगशिपचा किताब देण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे अशा नवीन AI टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवलेला सॅमसंगचा Galaxy S24 Ultra हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असु शकतो. परंतु त्याचसोबत आपण यातील काही समाधानकारक व असमाधानकारक गोष्टी याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे.
समाधानकारक / असमाधानकारक गोष्टी
समाधानकारक गोष्टी
- उत्कृष्ट डिस्प्ले आणी गोरिला ग्लास आर्मार प्रोटेक्शन.
- उत्कृष्ट बॅटरी लाईफ.
- वापरण्यायोग्य AI फिचर.
- सर्वोत्तम प्रोसेसर snapdragon 8 Gen 3.
- चांगली गुणवत्ता असलेले कॅमेरा.
- सोफ्टवेअर अपडेट पुढील 7 वर्षाची हमी.
असमाधानकारक गोष्टी
- बॉक्स मध्ये चार्जर उपलब्ध नाही.
- स्मार्टफोन ची किंमत खूप जास्त आहे.
- चार्जिंग स्पीड प्रतिस्पर्धी स्मार्टफोन पेक्षा खूप कमी वेगाचा आहे.
S24 Ultra Price
S24 Ultra याची किंमत भारतीय मार्केट मध्ये कमी जास्त होत असते. याचे कारण सण-उत्सव त्यावर येणार डिस्काउंट सेल्स यामुळे किंमत कमी जास्त होत असते. ज्यावेळी हा स्मार्टफोन भारतीय मार्केट मध्ये दाखल झाला होता. त्यावेळी या स्मार्टफोनची किंमत खालील प्रमाणे होती.
Samsung Galaxy S24 Ultra 256/12 – १,२९,९९९/-
Samsung Galaxy S24 Ultra 512/12 – १,३९,९९९/-
Samsung Galaxy S24 Ultra 1TB/12 – १,५९,९९९/-
परंतु आता येणाऱ्या Flipkart Big Billion Days या सेलमध्ये किंमतीत कमालीची घसरण पाहायला मिळणार आहे. तब्बल ४०,०००/- पर्यंतचा डिस्काउंट पाहायला मिळणार आहे. S24 Ultra 256/12 GB या सेलमध्ये तुम्हाला ९०,०००/- किंमतीपासून सुरवात होऊ शकेल. तसेच बँक डिस्काउंट आणी क्रेडिट कार्ड ऑफर यामुळे हि किंमत आणखी कमी होऊ शकते. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणी अमेझॉन या ऑनलाईन माध्यमातुन तसेच सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहेत. अजून Galaxy S24 Ultra याविषयी सखोल माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटला नक्की भेट द्या.
अधिकृत वेबसाइट – www.samsung.com